कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभय पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक विनोद मापारी, नगरसेवक मंगेश काळे, नगरसेवक राजेश मिश्रा, नगरसेवक सतीश ढगे, नगरसेवक शशिकांत योपडे, शिवसेना पदाधिकारी तरुण बघेरे, भरतीय जनता पक्षाचे नेते रंजीत खेडकर, रवींद्र भंसाली, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव हे मान्यवर उपस्थित होते. डी. बी. म्हैसने यांनी प्रास्ताविकातून प्रभाकर रुमाले यांच्य क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गाेषवारा मांडला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर रुमाले यांचा शाल, श्रीफळ, हार व गौरवपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमोल रावणकार, छत्रपती पुरस्कार्थी सौर सर, विदर्भ मुख्याध्यापक संघ, अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन, शारीरिक शिक्षक महामंडळ, सायकलिंग असोसिएशन, ॲथेलेटिक असोसिएशन, हॅण्डबॉल असोसिएशन, बॉडी बिल्डिंग असोसिएशन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, कलाल समाज मंडळ यांच्यावतीने रुमाले सरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीयूष रुमाले, परीक्षित रुमाले, प्रणव रुमाले व मित्र परिवारातर्फे व्हर्चूअल सायकलिंग, रनिंगव वॉकिंग स्पर्धेचे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील खेळाडूंना कॅश प्राईझ, स्मृतिचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
फोटो