अकोला, दि. ३- आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या वतीने बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे होणार्या सातव्या विश्व कॅरम स्पर्धेत सहभागी होणार्या भारतीय पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी अकोल्याचे प्रभजितसिंह बछेर यांची निवड झाली आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेचे पंच म्हणून विकास मुकादम सहभागी होत आहे.ऑल इंडिया कॅरम फेडरेशनतर्फे आयोजित सात दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी आलेल्या खेळाडूंना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंना विजयाकरिता शुभेच्छा दिल्या. पुरुष व महिला दोन्ही गटात भारतीय संघ विजेता आहे; मात्र पुरुष एकेरीचे विजेतेपद श्रीलंकेच्या डीएमडी फर्नांडो यांच्याकडे तर एकेरी विजेतेपद भारताच्या रश्मीकुमारीकडे आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या भारताच्या पुरुष संघात संदीप देवरू खकर (पेट्रोलियम स्पोर्टस् प्रामोशन बोर्ड), रियाज अकबर अली (एअर इंडिया), प्रशांत मोरे (रिझर्व बँक ऑफ इंडिया), आर.एम. शंकरा (एअर इंडिया) यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक प्रभजितसिंह बछेर आहेत. महिला संघात काजल कुमारी (पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशनल बोर्ड), एस. अपूर्वा (एलआयसी), एम. परिमल देवी, तुबा सेहर (पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशनल बोर्ड) यांचा समावेश असून, भारत भूषण हे व्यवस्थापक आहेत.माजी विजेता रश्मीकुमारी व योगेश परदेशी यांना एकेरी स्पर्धेसाठी इंटरनॅशनल कॅरम फेडरेशनचे वाइल्ड कार्ड प्रवेश दिला आहे. अकोल्याचे विकास मुकादम यांना कॅरम विश्व चषक पंच म्हणून श्रीलंका येथील २0१२ च्या स्पर्धेनंतर दुसर्यांदा या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. माजी राष्ट्रीय विजेते अरुण केदार भारतीय संघाचे प्रशिक्षक असून, या स्पर्धेसाठी व्ही.डी. नाराण यांना टेक्निकल डायरेक्टर व महेश सेकरी यांना मुख्य पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.या स्पर्धेत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, स्वित्झर्लंड, र्जमनी, फ्रान्स, इटली, झेक प्रजासत्ताक, पोलंड, मालदिव, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया, जापान, बांगलादेश व भारत अशा १७ देशाचा सहभाग असून, भारतीय संघ ५ नोव्हेंबर रोजी बर्मिंगहॅमसाठी रवाना होत आहे. भारतीय कॅरम संघाच्या व्यवस्थापक पदाची संधी अत्यंत महत्त्वाची असून विदर्भ कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. अजहर हुसैन आणि कॅरम फेडरेशन मीडिया कमिटी डायरेक्टर संदीप पुंडकर यांना असल्याचे बछेर यांनी सांगितले.
भारतीय कॅरम संघ व्यवस्थापकपदी प्रभजित बछेर
By admin | Published: November 04, 2016 2:23 AM