अकोला : बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये बालसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली असून, यावर सामाजिक भाण निर्माण करण्याच्या हेतूने प्रभात किड्स स्कूल येथे ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा ३१ मार्च रोजी संपन्न झाली. यावेळी ‘प्रभात’ परिवारातील सर्व सदस्यांनी ‘आम्ही बालसंरक्षक’ अशी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘प्रभात’चे संचालक डॉ. गजानन नारे होते. समुपदेशक डॉ. प्रदीप अवचार यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ‘प्रभात’च्या संचालिका सौ. वंदना नारे, व्यवस्थापक अभिजित जोशी, निमिष तिवारी, उपप्राचार्य वृषाली वाघमारे, अर्चना बेलसरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने प्रभात किड्स स्कुल येथे सुरवातीपासूनच दक्ष आहे. समाजात कुठेही बालक शोषणास बळी पडत असेल तर धावून जाण्याचा निर्धार कर्मचाठयांच्या वतीने डॉ.प्रदीप अवचार यांनी यावेळी व्यक्त केला. बालहक्क व सुरक्षेसाठी भारतीय संविधानात विविध तरतूदी केल्या आहेत. तसेच या नियमांच्या अमंलबजावणीसाठी विविध शासकीय संस्था कार्यरत असल्याचे सांगून, समाजातील प्रत्येक घटकाने बालसुरक्षिततेसाठी पुढे येऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ.गजानन नारे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक हिताच्या दृष्टिने बालसुरक्षेसाठी सैदव तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ.गजानन नारे यांच्या हस्ते ‘आम्ही बालसंरक्षक’ या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. तसेच प्रभात किड्स स्कूलच्या चालक, वाहक व तार्इंसह इतर सदस्यांना ‘आम्ही बालसंरक्षक’ हे बोधचिन्ह असलेले बॅचेस लावण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे व कर्मचाठयांनी विशेष प्रयत्न घेतले.
‘प्रभात’परिवाराने उचलले बालसुरक्षेसाठी पाऊल ; ‘आम्ही बालसंरक्षक’ पोस्टरचे विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 6:53 PM
अकोला : बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये बालसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली असून, यावर सामाजिक भाण निर्माण करण्याच्या हेतूने प्रभात किड्स स्कूल येथे ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा ३१ मार्च रोजी संपन्न झाली
ठळक मुद्दे‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा ३१ मार्च रोजी संपन्न झाली. यावेळी ‘प्रभात’ परिवारातील सर्व सदस्यांनी ‘आम्ही बालसंरक्षक’ अशी शपथ घेतली. समाजात कुठेही बालक शोषणास बळी पडत असेल तर धावून जाण्याचा निर्धार कर्मचाठयांच्या वतीने डॉ.प्रदीप अवचार यांनी यावेळी व्यक्त केला.