अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसर आणि वार्डांमध्ये कमालीची अस्वच्छता पसरली असून, रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयातील अस्वच्छता दूर करून रुग्णांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे सोमवारी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना देण्यात आला.सर्वोपचार रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण येतात. परंतु, या रुग्णांना येथे योग्य प्रमाणात सोयी-सुविधा मिळत नाहीत. सर्वच वार्डांमध्ये कमालीची अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे येथे येणारे रुग्ण बरे होण्याऐवजी अधिकच आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) मध्ये दररोज १२०० ते १५०० रुग्णांची नोंद होते. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना औषध वाटपासाठी केवळ तीनच काउंटर असल्याने तेथे रुग्णांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे रुग्णांसाठी अतिरिक्त काउंटर उघडण्यात यावे, अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठीही खूप प्रतीक्षा करावी लागते. याबाबतही उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना रुग्णालयातील अस्वच्छता दर्शविणारी छायाचित्रे भेट म्हणून दिली. यावेळी जिल्हाप्रमुख तुषार फुंडकर, उपजिल्हा प्रमुख निखिल गावंडे, श्याम राऊत, निलेश ठोकळ, संतोष पाटील, बॉबी पळसपगार, गोविंद गिरी, पंकज तेलगोटे, कुणाल राठोड, निखिल नालट, नितीन ठाकरे, आकाश पतिंगे, आकाश अंभोरे, आशिष काकड आदी उपस्थित होते.
‘सर्वोपचार’मधील अस्वच्छतेच्या मुद्यावर ‘प्रहार’ आक्रमक ; अधिष्ठातांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:29 PM
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसर आणि वार्डांमध्ये कमालीची अस्वच्छता पसरली असून, रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयातील अस्वच्छता दूर करून रुग्णांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे सोमवारी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना देण्यात आला.
ठळक मुद्दे रुग्णांना येथे योग्य प्रमाणात सोयी-सुविधा मिळत नाहीत. सर्वच वार्डांमध्ये कमालीची अस्वच्छता पसरली आहे. औषध वाटपासाठी केवळ तीनच काउंटर असल्याने तेथे रुग्णांची प्रचंड गर्दी होते.