शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस विरोधात ‘बॅटींग’ सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:48 PM

अकोला- भाजपाचा विजयी रथ थांबविण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमध्ये भारिप-बमसंचा सहभागही महत्त्वाचा होता. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेत १२ जागांचा प्रस्ताव दिला होता.

- राजेश शेगोकार

अकोला- भाजपाचा विजयी रथ थांबविण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमध्ये भारिप-बमसंचा सहभागही महत्त्वाचा होता. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेत १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाची दखल घेण्यात काँग्रेसने लावलेला वेळ, दरम्यानच्या काळात भारिप-बमसंने वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून बहुजनांच्या अस्मितेला घातलेली फुंकर अन् एमआयएमसोबत घोषित केलेली मैत्री या सर्व घडामोडीमुळे महाआघाडीतील अ‍ॅड.आंबेडकरांच्या समावेशाला अनेक अडथळे निर्माण झाले; मात्र हे सारे बेदखल करीत काँग्रेस अ‍ॅड.आंबेडकरांच्या बाबतीत प्रचंड आशावादी असल्याचे चित्र उभे करीत असतानाच दुसरीकडे अ‍ॅड.आंबेडकर मात्र काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे काँग्रेस विरोधातील त्यांच्या ‘बॅटींग’मुळे महाआघाडीतील त्यांच्या समावेशाची शक्यताच धुसर झाली आहे.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परवा अमरावतीला झालेल्या वंचित बहुूजन आघाडीच्या सभेत लोकसभेचा पाचवा उमेदवार जाहीर केला. अमरावती लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीनं गुणवंत देवपारे यांना उमेदवारी जाहीर केली. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आता आंबेडकरांसोबत आघाडी होण्याबाबत आशावादी असतानाच दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आपला एक-एक उमेदवार जाहीर करत आहेत. त्यामुळे काँग्रेस-आंबेडकरांच्या संभाव्य आघाडीचं त्रांगडं सुटण्याची शक्यता कमीच आहे. आंबेडकरांनी आतापर्यंत माढा, नांदेड, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून उमेदवार जाहीर केलेत. विशेष म्हणजे जाहीर केलेल्या उमेदवारांच्या माध्यमातून अनेक वंचित समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पाच उमेदवारांत दोन धनगर, प्रत्येकी एक माळी, बौद्ध आणि बंजारा समाजाचे उमेदवार आहेत.आंबेडकरांनी एमआयएमला सोबत घेत वंचित बहुूजन आघाडीची मोट बांधली. राज्यात औरंगाबादपासून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेत औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, अमरावतीत जंगी सभा घेतल्या. एमआयएम आंबेडकरांसोबत असल्यानं काँग्रेसनं आंबेडकरांसोबतच्या प्रस्तावित आघाडीत अडचणी येत असल्याचं अनेकदा स्पष्ट केलंय. नांदेडच्या सभेत एमआयएमनं आंबेडकरांसाठी वंचित आघाडीतून बाजूला होण्याची तयारी दर्शविली. काँग्रेसने त्यानंतर आघाडीची मोठी अडचण दूर होणार असल्याचं सांगत आंबेडकरांना सोबत घेण्याचे संकेत दिलेत; मात्र काल अमरावतीत आंबेडकरांनी पाचवा उमेदवार जाहीर करीत आघाडीच्या शक्यता धुसर असल्याचेच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी तर छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार न देता राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरणार असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आल्याने महाआघाडीतील अ‍ॅड.आंबेडकरांच्या समावेशाबाबत चित्रच स्पष्ट झाले आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेसचा आशावाद कशाच्या बळावर आहे? याचे कोडं खुद्द काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनच पडले आहे.

ओबीसीं जागरासाठी भुजबळांना पाठींबा

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे नियोजन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या नियोजनामागे ओबीसी ‘वोट बँक’ कॅश करण्याचा अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न असून, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे लोकसभा निवडणूक लढवित असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा सोमवारी माजी आ.हरिदास भदे यांनी केली. ओबीसींचे नेते म्हणून भुजबळांची प्रतिमा देशपातळीवर निर्माण करण्यासोबतच भुजबळांचा प्रभाव असणाºया माळी समाजाच्या मतपेढीकडेही या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसPoliticsराजकारण