नवीन होलसेल किराणा मार्केटमध्ये कृष्णा तेल भंडार येथे खाद्यतेल घेण्यासाठी आलेल्या अमोल वानखडे नामक तरुणाला दुकान मालक मुकेश बगडिया यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर अमोल महादेव वानखडे यांनी त्याच्या भावासह जुने शहर पोलीस स्टेशनला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली. जुने शहर पोलिसांनी आरोपी दुकानदार मुकेश गोपाळ बगडिया आणि तेथील कामगार शेख अरबाज शेख मनसब व त्याचा भाऊ शेख शहजाद शेख मनसब यांच्याविरुद्ध भादवि कलम ३२३,३२४, ५०४, ३४, (३), (२) आणि जातीवाचक शिवीगाळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. आरोपी मुकेश बगडिया यांनी ॲड. सुमित महेश बजाज यांचेमार्फत न्यायालयात दाद मागितली. या खटल्यात आरोपीवर असलेल्या गुन्ह्यासंदर्भात ॲड. सुमित महेश बजाज व ॲड. भाग्यश्री किटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून तिसरे तदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मारहाण ॲट्रॉसिटीच्या आरोपींना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:17 AM