कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा केंद्रांवर कोविड प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या होत्या. त्याकरिता परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना बदलून त्यांच्या ऐवजी अतिरिक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्यातील १८ उपकेंद्रांवर झालेल्या परीक्षेत पहिल्या सत्रात ३ हजार २१३ तर दुसऱ्या सत्रात ३२०२ उमेदवार उपस्थित होते. प्रत्येक उपकेंद्रावर बेसिक कोविड किट, परीक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारास हातमोजे, मास्क, सॅनिटायझर दिल्या गेले. थर्मल स्कॅनिंग करण्यात आली. तसेच परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने फेसशिल्ड, हातमोजे, मास्क व सॅनिटायझरचा वापर केला. सोशल डिस्टन्सिंग ठेवत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोनाचे लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारास तसेच पर्यवेक्षणाकरिता नियुक्त समवेक्षकाला पीपीई किट देण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. परीक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यात १८ केंद्रांवर झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:17 AM