लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्चिम विदर्भात (वर्हाड)काही भागात मान्सूनपूर्व कापूस पीक घेतले जाते; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे सुरुवातीला या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. नंतर हे पीक फुलोर्यावर आले, तेव्हा मात्र सतत जोरदार पाऊस पडल्याने फुलोरा गळाला; तसेच हवामानात सारखे बदल होत गेल्याने कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. आता तर पांढरी माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे कापसाचे नुकसान झाले असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.पश्चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्हय़ात मान्सूनपूर्व कपाशीचे पीक घेतले जाते. त्यासाठीची तयारी शेतकरी एप्रिल महिन्यातच करीत असतात. मे महिन्यात या कपाशीची पेरणी केली जाते. पश्चिम विदर्भातील उन्हाळा जगजाहीर आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी विहिरी, तलावा तील पाणी संपते. त्यामुळे शेतकर्यांना नैऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा असते. तथापि, यावर्षी पाऊस एक ते दीड महिना उशिरा आला. या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नसल्याने सुरुवातीला िपकांना फटका बसला.दरम्यान, कपाशीवर विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला असून, पांढरी माशीचा जोर वाढत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानाची पातळी गाठण्यापूर्वी शेतकर्यांनी शेताचे नियमित सर्वेक्षण करावे. त्यासाठी २0 झाडे निवडावीत. प्रत्येक पानावर प्रती दहा माशा दिसल्यास नुकसान वाढण्याची शक्यता असते. अशा शेतात शेतकर्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी करू न व्यवस्थापन करावे, तसेच अनुजीविकरपा, पानावरील ठिपक्यांचा-रोगाचा काही भागात प्रादुर्भाव आहे. वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे नियमित क पाशीवर हिरवी, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुड तुड्यांचा प्रभाव कमी झाला असला, तरी काही भागात थोड्याफार प्रमाणात कपाशीवर तुडतुडे दिसत आहेत.
सोयाबीनचे पीक फुलले !सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक फुलले आहे. अनेक ठिकाणी शेंगांचा चांगलाच बहर आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चमुने केलेल्या सर्वेक्षणात अनेक भागात सोयाबीनच्या एका झाडाला ३0 ते ३५ शेंगा आल्या आहेत.
वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे मान्सूनपूर्व कापसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर नियमित कपाशीवर हिरवी व गुलाबी बोंडअळी आली आहे. शेतकर्यांनी दररोज शेताचे सर्वेक्षण करू न किडींचे व्यवस्थापन करावे.- डॉ. अनिल कोल्हे,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.