अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रिया तसेच रॅण्डम राउंडने अन्यायकारक बदली झालेल्या गरोदर, स्तनदा माता शिक्षिकांना शनिवारी समुपदेशनाद्वारे नियुक्ती देत न्याय देण्यात आला. त्यासाठी सकाळीच जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह महिला शिक्षिका उपस्थित होत्या.जिल्हा परिषद शिक्षक संघटना संघर्ष समितीने १० आॅक्टोबरपासून सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसºया दिवशी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावेळी प्रशासनाने शनिवारी समुपदेशनाने महिला शिक्षिकांना नियुक्ती दिली जाईल, असे सांगत गटशिक्षणाधिकाºयांना त्यासाठी नोटीसही दिली. त्यानुसार शनिवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, प्रभारी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने बदली आदेश देण्यात आला. त्यानुसार प्रिया पागधुणे, रूपाली वारकरी, स्विटी मोर, स्वप्ना गणवीर, पूनम बाहकर, विजयश्री वानखडे, प्रीती झापर्डे, स्वाती धोत्रे, उज्जैनकर, प्रियंका ढाकरे यांना पदस्थापना देण्यात आली.यावेळी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टोहरे, अरुण धांडे, राजेंद्र ताडे, प्रशांत आकोत, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, राजेश देशमुख, शंकर डाबेराव, गजानन साटोटे, प्रताप वानखडे, विलास मोरे, गीताबाली उनवणे व शिक्षक संघटना संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सभापती अरबट यांनी विचारला जाबमहिला शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्याबाबत विभागीय आयुक्तांनी ३ सप्टेंबर रोजी पत्र दिले. त्यावर प्रशासन, शिक्षण विभागाने काहीच कार्यवाही केली नाही. याबाबत शिक्षण सभापती अरबट यांनी जाब विचारला, तसेच समुपदेशन प्रक्रियेत सहभागी नसताना शिक्षिका गीताबाली उनवणे यांच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर अधिकाºयांनीही त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.