शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नोकर भरती कपातीची तयारी अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 9:14 AM

आकृतिबंध निश्चितीची ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत: माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला

सदानंद सिरसाट/अकोला, दि. 8 -  महसूल वाढीच्या दरापेक्षा वेतनवाढीचा सरासरी दर अधिक असू नये, या सूत्रासोबतच माहिती तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांचा वापर करून येत्या काळात शासनाच्या नवीन नोकर भरतीमध्ये ३० टक्के कपातीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी पदांचा आकृतिबंध ३१ ऑगस्टपर्यंत सादर न करणा-या शासकीय विभागांच्या भरतीवरील निर्बंध कायम ठेवण्याची तंबीही शासनाने आधीच दिली आहे.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात राज्याच्या स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मार्च २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ती सादर करण्यात आली. त्यामध्ये दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनवाढीवरील खर्चाचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये, हे तत्त्व सर्वमान्य असल्याचे नमूद करण्यात आले. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजांमध्ये महसूल वाढीचा दर ९.६४ टक्के इतका अपेक्षित धरण्यात आला. हा वाढीव दर लक्षात घेता वित्तीय स्थैर्यासाठी तत्त्व पाळणे आवश्यक असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. सोबतच सातव्या वेतन आयोगातून वेतनावरील खर्चात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन पदनिर्मिती तसेच पदभरतीवर नियंत्रण आणण्याचा उपाय करण्यात आला. त्यातून लाखो बेरोजगार तरुणांची आणखीच मुसकटदाबी होण्याची चिन्हे आहेत.- नवीन पदनिर्मिती आधीपासूनच बंदशासनाने वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या निर्णयाच्या दिवसापासूनच नवीन पदनिर्मिती पूर्णपणे बंद केली आहे. २ जून २०१५ रोजीच्या आदेशाने तसे बंधन घालण्यात आले. त्यातून सिडको, एमएमआरडीए, पीएमआरडीए, एनआयटीसारख्या काही आर्थिक सक्षम स्वायत्त संस्थांना वगळले.- ‘क’ वर्गातील पदभरतीतही खोडाज्या संवर्गाच्या खांद्यावर प्रशासकीय कामकाजाचा डोलारा आहे, त्या ‘क’ वर्ग पदभरतीतही त्याच आदेशाने खोडा घालण्यात आला. त्यातून शिक्षक, पोलीस कॉन्स्टेबल, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य परिचारिका, पशुधन पर्यवेक्षक, मत्स्य व्यवसाय विभागाचे तालुका स्तर अधिकारी, वनरक्षक, कृषी सहायक, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता या संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या ७५ टक्के पद भरण्याची सोय, तर इतर संवर्गासाठी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ५० टक्के किंवा एकूण संवर्गाच्या चार टक्के यापैकी जे कमी असेल, तेवढी पदे भरण्याची सोय ठेवण्यात आली. ती संख्या नगण्य असल्याने पदभरती जवळपास बंदच आहे.- पदे भरण्यासाठी समितीकडे प्रस्तावच नाहीत्याशिवाय इतर पदे भरण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्या समितीपुढे प्रस्ताव आल्यास पदभरतीला मंजुरी मिळेल. त्याचवेळी प्रस्ताव सादर करताना विभागाने खात्यात सध्या वेतनावर होणारा खर्च, त्यात होणारी संभाव्य वाढ याचा आढावा घेऊनच प्रस्ताव सादर करण्याचे बजावले. त्या प्रस्तावांवर निर्णयही अधांतरी आहेत.- समायोजनाच्या पर्यायाला फाटाप्रशासकीय विभागाला प्रशासनावर कोणताही परिणाम न होता विभागातील एकूण उपलब्ध कर्मचाºयांचे समायोजन करण्याचे अधिकार आहेत. कामांची आवश्यकता कमी झाल्यास अतिरिक्त ठरणारा अधिकारी-कर्मचारी वर्गाला वित्त विभागात कार्यरत असलेल्या अतिरिक्त संवर्ग कक्षाकडे वर्ग करण्याचा पर्यायही देण्यात आलेला आहे. त्याचवेळी शासनाच्या कोणत्याही विभागाने आदेशाच्या दिनांकापासून तसे समायोजनच केले नसल्याचा प्रकारही घडला आहे.- सुधारित आकृतिबंधानंतरच पदनिर्मितीनवीन पदनिर्मिती करून त्या पदांची भरती करण्यासाठी शासनाने ३० एप्रिल २०१७ पर्यंत आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या मुदतीत कोणत्याच विभागाने आकृतिबंध तयार केला नाही. त्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली. त्या आकृतिबंधात मानव संसाधनाची मागणी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे बजावण्यात आले. आता अंतिम टप्प्यात असलेल्या आकृतिबंधाने शासकीय रोजगारामध्ये ३० टक्के घट होणार आहे.- मुख्यमंत्री म्हणतात, मागणी घटवा!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक विभागाने आयटी सोल्युशनच्या माध्यमातून गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करावे, त्या माध्यमातून मानव संसाधनाची मागणी ३० टक्क्यांपर्यंत खाली आणावी, त्यासाठी शासनाच्या सर्व विभाग प्रमुखांनी स्वत: लक्ष घालून काम करण्याचे बजावले आहे.