गणेश मंडळांना मिळणार घरगुती दराने वीज जोडणी
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे, त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे, तसेच या तात्पुरत्या जोडणीच्या वीज वापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार तो गुन्हा ठरतो. कोणत्याही गणेश मंडळाने अनधिकृत वीजजोडणी घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
गणरायांची उंची ४ फुटांपर्यंतच
सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांसाठी गणरायाची ४ फूट उंच मूर्ती, तसेच घरगुती दोन फूट उंच मूर्तीची स्थापना करण्याचे निर्देश आहेत.
एक खिडकी याेजनेचा मंडळानी घेतला लाभ.
सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना मनपासह पाेलीस प्रशासन, महावितरण, अग्निशमन विभाग आदी विविध विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्रासाठी धावाधाव करावी लागते. ही धावपळ टाळण्यासाठी मनपाच्या मुख्य सभागृहात सर्व परवानगी देण्याच्या उद्देशातून एक खिडकी याेजना सुरू करण्यात आली आहे. या याेजनेचा मंडळांनी लाभ घेतला.
काेराेनाच्या नियमांचे पालन करा!
सार्वजनिक, तसेच घरगुती गणेशाेत्सव साजरा करताना काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळाच्या वतीने भक्तांसह मंडळांनाही करण्यात आले आहे.