अकोला : शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटीयार यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.२०१७ ते २०२० या कालावधीत शासनामार्फत आॅनलाइन राबविण्यात आलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत विविध जिल्हा परिषदांतर्गत आंतरजिल्हा बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करून घेण्यासह रुजू करून घेण्याचा आदेश ग्रामविकास विभागामार्फ त २५ आॅगस्ट रोजी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्हा परिषद अंतर्गत आंतरजिल्हा बदली झालेल्या मराठी माध्यमाच्या १९ व उर्दू माध्यमाच्या २ अशा एकूण २१ प्राथमिक शिक्षकांना रुजू करून घेण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी २७ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले. त्यानुषंगाने जिल्हा परिषद अंतर्गत आंतरजिल्हा बदली झालेल्या संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली.