शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

"गरज अन् शक्यता लक्षात घेऊन जिल्हा विकासाचे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा"

By संतोष येलकर | Published: October 16, 2023 2:59 PM

पालकमंत्र्यांचे निर्देश: जिल्ह्यातील विकासकामांचा घेतला लेखाजोखा

संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील विकासकामांची गरज व पुढील काळात विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित विविध विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस आधीक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आवश्यक विकासकामे व विकासप्रक्रियेला दिशा देण्यासाठी येत्या काळात अपेक्षित बदलांचा वेध घेऊन सादरीकरण तयार करावे पुढील वेळी त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

अकोट तालुक्यासह व इतर तालुक्यांतही  वर्गखोल्या शिकस्त असल्याने पाडण्यात आल्या. त्यावेळी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते; मात्र तसे करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कक्ष नाहीत, याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचे सांगत मनरेगा, जिल्हा नियोजन निधी आदींतुन कालमर्यादित कार्यक्रम निश्चित करून हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात दुग्धोत्पादन विकासासाठी मुरघास, वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव देण्याचे सांगत,जलयुक्त शिवार योजना टप्पा २ मध्ये १ हजार ६७४ कामे नियोजित आहेत. यापूर्वीच्या कामांतील गेटची कामे  पूर्ण करून वाढीव निधीची गरज असल्यास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

' जल जीवन मिशन ' च्याकामांचे फलक १५ दिवसात लावा!

'जल जीवन मिशन' मध्ये जिल्ह्यात  जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदकडून सुरू असलेल्या कामांची सद्य:स्थिती, खर्च, नकाशे, झालेली कामे आदी  माहिती देणारे फलक पुढील १५ दिवसांत लावण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य, शिक्षण, वने, आदिवासी विकास आदी विविध विभागांचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAkolaअकोला