अकोला: वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील कार्यक्रमासाठी अकोला विमानतळावर आगमन झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिले. तसेच मुंबईमध्ये हजर राहण्याचा आदेश दिला. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार सोमवारी रात्री जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासह निवडक पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील नियोजित कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोमवारी सकाळी विमानाद्वारे शिवनी विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. विप्लव बाजोरिया, माजी आमदार दाळू गुरुजी, संजय गावंडे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी विमानतळावर सेवकराम ताथोड, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, दिलीप बोचे, रवींद्र पोहरे, हरिभाऊ भालतिलक, शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, शहर प्रमुख (पश्चिम) राजेश मिश्रा, तालुका प्रमुख विकास पागृत, श्याम गावंडे, अप्पू तिडके, रवींद्र मुर्तडकर, संजय शेळके , प्रदीप गुरुखुद्दे, रमेश अप्पा भुसारी, जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, ज्योत्स्रा चोरे, उपजिल्हा संघटिका रेखा राऊत, शुभांगी किनगे, नीलिमा तिजारे, वर्षा पिसोळे, सरिता वाकोडे, शहर संघटक संतोष अनासने, तरुण बगेरे, शहर प्रमुख अजय ढोणे, आनंद बनचरे, सुनील रंदे, विनायक गुल्हाने, नगरसेवक गजानन चव्हाण, मंगेश काळे, केदार खरे, अविनाश मोरे, बंडू सवाई, अर्जुन गावंडे, दिनेश सरोदे, अभिषेक खरसाडे, योगेश अग्रवाल, संजय भांबेरे, उमेश राऊत, प्रमोद धर्माळे, गजानन बोराळे, युवा सेना जिल्हाअधिकारी विठ्ठल सरप, राहुल कराळे, अनिल परचुरे, नितीन ताथोड, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. पोहरादेवी येथील कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे हेलिक ॉप्टरने रवाना झाले.आ. बाजोरियांनी सुनावले खडे बोल!विमानतळावर मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे यांचे आगमन होणार असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. विमानतळावर पक्षाचे निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडवणूक होत असल्याच्या मुद्यावरून शिवसेना आमदार गोपीकिशन बााजेरिया व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनीही अधिकाऱ्यांच्या मनमानीवर संताप व्यक्त केला. वाद वाढत असल्याचे पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मध्यस्थी केली. यावेळी आ. बाजोरिया यांनी काही अधिकाºयांना चांगलेच खडे बोल सुनावले.पक्षप्रमुख म्हणाले कामाला लागा!पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवी येथील कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने निघण्याच्या तयारीत असताना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना बोलावून घेतले. त्यावेळी झालेल्या संभाषणादरम्यान पक्ष प्रमुखांनी जिल्हाप्रमुखांना कामाला लागण्याची सूचना केली.