राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाळा लांबल्याने विदर्भातील शेतकऱ्यांसह सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आपत्कालीन नियोजन केले आहे. ३० जूनपर्यंत पाऊस आला नाही तर खरिपातील काही पिकांमध्ये शेतकऱ्यांना फेरबदल करावे लागणार आहेत. त्यासाठीची शिफारस करण्यात आली आहे.खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; परंतु यावर्षी जूनचा पहिला व दुसऱ्या आठवड्यात अद्याप पाऊस आला नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पिकांचे नियोजन केले आहे. नियमित पावसाळा दोन आठवडे उशिरानेही सुरू न झाल्याने कृषी विद्यापीठाने पीक पेरणीसाठी काही सूचना केली आहे. सलग कपाशीसाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे आवश्यक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांना करावा लागेल तसेच कापूस अधिक तूर (६:२) आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. यावर्षी सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. सलग ज्वारी पिकासाठी शिफारशीसह ज्वारी अधिक तूर (३:३) आंतरपीक पद्धतीमुळे फायदा होतो. कापूस अधिक तूर (६:२) किंवा सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक घ्यावे. मूग, उडीद पिके ही उथळ काळ््या जमिनीत लावावे, धान शिफारशीप्रमाणे रोवणी करावी, साकोली-६, पीकेव्ही मकरंद, पीकेव्ही गणेश, पीकेव्ही एचएमटी, सिंदेवाही २००१ या वाणांची निवड करावी.मूग, उडिदाचे दिवस गेले!मूग व उडीद पिकांची पेरणी याच आठवड्यात करणे आवश्यक होते. तथापि, पावसाने दडी मारल्याने या पिकांची पेरणी रखडली आहे. आता या पिकांच्या पेरणीचे दिवस संपल्यासारखेच आहेत.मूग, उडिदाची पेरणी या आठवड्यात होणे गरजेचे होते आता या पिकांच्या पेरणीचे दिवस गेले आहेत. सोयाबीन १५ जुलैपर्यंत पेरता येईल. कापूस पिकाला अद्याप अवधी आहे. पाऊस आणखी दोन, चार आठवडे लांबल्यास मात्र कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पिकांचे नियोजन करावे लागेल.डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.
आपत्कालीन पीक नियोजन तयार!
By admin | Published: June 30, 2017 1:39 AM