----------------------------------
पातूर तालुक्यात आंब्याचे नुकसान
पातूर : तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शुक्रवार, शनिवार तसेच रविवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सध्या शेतात आंब्याची झाडे फळांनी लगडलेली आहेत. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे क्षेत्र आहे. सध्या शेतात आंब्याची झाडे फळांनी लगडलेली असून, काही आंबा बाजारात दाखल झाला आहे. जिल्ह्यात गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे भुईमूग पिकासह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबरोबरच बागायती पीक, भाजीपालावर्गीय पिकांची नासाडी झाली आहे.