अकोला - तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेत दुसर्या दिवशी अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी अभ्यासपूर्ण निबंधांचे सादरीकरण केले. यावेळी ह्यजैवतंत्रज्ञान, पर्यावरण आणि भारतीय शेतीची वाटचालह्ण या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. विनायक भिसे होते. या चर्चासत्रामध्ये डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. तानाजीराव गीते, प्रा. शंकर पवार, डॉ. मोहन चौधरी, डॉ. आर.बी. भांडवलकर, डॉ.के.आर. राजपूत, डॉ.डी.के. राठोड, प्राचार्य दिलीप पाटील, प्रा. प्रकाश बुटे यांनी अभ्यासपूर्ण निबंध सादर केले. डॉ. विनायक भिसे यांनी अध्यक्षीय भाषणात अर्थशास्त्राचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध व त्याचा व्यवहारावर होणारा परिणाम, याबाबत माहिती विशद केली. दुपारच्या सत्रात ह्यमहाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल सद्यस्थिती व आव्हानह्ण या विषयावर निबंधाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, डॉ. सुभाष गुर्जर व्यासपीठावर उपस्थित होते. या विषयावर डॉ. तेजस्विनी मुंडकर, डॉ. सुभाष गुर्जर, डॉ. अविनाश निकम, डॉ. विद्या पाटील, डॉ. धनश्री महाजन, डॉ. राहुल म्हापरे, डॉ. अशोक खाचने या प्राध्यापकांनी निबंधांचे सादरीकरण केले. यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विनायक देशपांडे यांनी महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल सद्यस्थिती व आव्हानाबाबत विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या सत्रानंतर प्रा. डॉ. श्री. आ. देशपांडे स्मृती जीवन गौरव पुरस्कार समारंभ घेण्यात आला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र भांडवलकर यांनी तर मनोगत डॉ. रामदास मोहोरे, डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ.जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केले.
अकोला येथील अर्थशास्त्र परिषदेत अभ्यासपूर्ण निबंधांचे सादरीकरण
By admin | Published: November 09, 2014 12:38 AM