अकोला: जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच लोकसभा-विधानसभा निवडणुका डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने सर्कलनिहाय तब्बल ६ हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, सदर अहवाल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी रविवारी पक्षाकडे सादर केला.राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच मित्र पक्षाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. शेतकºयांच्या ज्वलंत विषयावर ठिकठिकाणी भाजपविरोधात मोर्चे काढण्यात आले. यापुढे भाजपसोबत कोणत्याही निवडणुकांमध्ये युती करणार नसल्याचे स्पष्ट करीत आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा जाहीर केले आहे. निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्यापूर्वी पक्ष बांधणी मजबूत करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना दिले होते. त्यानुषंगाने पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत यांनी जिल्हा पातळीवर प्रमुख पदाधिकाºयांना कामाला लावले. संपर्क प्रमुखांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सर्कल प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यासोबतच बुथ प्रमुखांच्या नियुक्त्यावर भर दिल्याचे समोर आले आहे. जिल्हाप्रमुख देशमुख यांनी रविवारी मुंबई येथे ६ हजार बुथ प्रमुखांचा अहवाल पक्षाकडे सादर केला. यावेळी निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जि.प. सदस्य महादेव गवळे उपस्थित होते.सहा हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्याजिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने ६ हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यापूर्वीच्या एक बुथ एक कार्यकर्ता या समीकरणाला फाटा देत जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी एका बुथसाठी पाच बुथ प्रमुखांची नियुक्ती केली. बुथ प्रमुखांसह विभाग प्रमुखांवर मतदारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.दसºयानंतर बुथ प्रमुखांचा मेळावापाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दीड हजार याप्रमाणे ६ हजार बुथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. दसºयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुथ प्रमुखांचा मेळावा आयोजित केला जाण्याची दाट शक्यता आहे.