हिवरखेड : येथून जवळच असलेल्या तळेगाव येथील एका युवतीचा विनयभंग केल्याची पाेलिसात दाखल तक्रार मागे घेण्यासाठी पीडित युवतीच्या कुटुंबावर दबाव आणल्याने धास्तावलेल्या युवतीने साेमवारी आत्महत्या केली. या प्रकरणात युवतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवतीचे वडील यांनी दिलेल्या मुलीच्या विनयभंग प्रकरणात दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी विनयभंगासह जातीवादी अत्याचार कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. यामुळे चिडलेल्या आराेपींनी व त्यांनी सदर कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आराेप आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, तक्रार मागे घेतली नाही तर तुझ्या कुटुंबाला मारुन टाकू, तुम्हाला गावात राहू देणार नाही, अशी धमकी आराेपींनी दिल्याने पीडित युवती तणावात हाेती व ती प्रचंड घाबरलेली हाेती, त्यामुळे आराेपींच्या धमक्यांना कंटाळून युवतीने आत्महत्या केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डिगांबर ऊर्फ बबलु नाजुक शिंगोकार, अजय शिवाजी शिंगोकार, वनीता शिवाजी शिंगोकार, मनोरमा डिगांबर शिंगोकार, मिना डिगांबर शिंगोकार, नाजुक गुलाबराव शिंगोकार, शिवाजी नाजुक शिंगोकार, गौरी शिवाजी शिंगोकार यांच्याविरुद्ध कलम ३०६, ५०६, ३४ अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (I) (R) (S) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास एसडीपीओ सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू खचे, विलास अस्वार, पोलीस कर्मचारी करीत आहेत.