अकोला: एड्स तसेच तंबाखू जन्य पदार्थ्यांच्या सेवनाने होणारे कॅन्सर सारखे रोग कोणतीही उपचाराने पुर्णपणे बरे होवू शकत नाही. त्यामुळे जनजागृती हाच एक प्रतिबंध उपाय व उपचार आहे. यासाठी परिवारातील लोकांनी संवाद साधून व्यसनाबाबत जनजागृती करून अशा रोगांचा प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.पर्यावरणाच्या रक्षणासाठी दर महिन्याच्या एक तारखेला ‘सायकल डे’साजरा करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुरु केला. त्या बरोबरीने एक सामाजिक संदेशही ते जनतेला देतात. राष्ट्रीय एडस दिनानिमित्य तसेच मौखिक आरोग्य तपासणी मोहिम अंतर्गत एडस व तंबाखू जन्य पदार्थ्यांच्या सेवनाबाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली. स्वत: जिल्हाधिकारी सकाळी ८.३० वाजता आपल्या बंगल्यावरुन खंडेलवाल टॉवर मार्गे अग्रसेनचौक, दुर्गा चौक ते रतनलाल चौक मार्गे नेहरू पार्क चौक , अशोक वाटीका ते सर्वोपचार रूग्णालय येथे सायकलवरुन पोहोचले. यावेळी त्यांच्या समवेत यावेळी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर , शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते , जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चौहान , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आदींसह अधिकारी,कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.
मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन