अकोला : शेतमालाचे दर मार्चपर्यंत वधारतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीकरिता ठेवला होता. आता कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन झाले आहे. यामुळे शेतमाल विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.कापसाचे दर घसरले होते यामुळे शेतकºयांनी कापूस विक्री थांबविली होती. मधात बरसलेला अवकाळी पाऊस याला कारणीभूत होता. या स्थितीमधून शेतकरी बाहेर पडताच कोरोनाचे नवे संकट उभे झाले. पणन महासंघाने कापसाची खरेदी थांबविली आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर आणखी पडले आहेत.तूर, हरभरा, गहू काढला जात आहे. काढलेला हा शेतमाल विक्रीकरिता बाजारपेठच उघडी नाही. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. बाजार दर ठरविणारा एनसीडीक्स सध्या तेज आहे. या स्थितीत बाजारपेठ बंद आहे. सोयाबीन ३,६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तूर ५४०० पर्यंत विकल्या जाण्याची शक्यता आहे. तर हरभºयाचे दर ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचतील असा अंदाज एनसीडीएक्सवरून वर्तविला जात आहे. मागणी आहे; मात्र कच्चा माल नाही, अशी संपूर्ण अवस्था देशभरात आहे. यातून शेतमालाचे दर वधारले आहेत.
भाव वधारले; पण शेतमाल विकायचा कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 5:59 PM
शेतमाल विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देकाढलेला हा शेतमाल विक्रीकरिता बाजारपेठच उघडी नाही.पणन महासंघाने कापसाची खरेदी थांबविली आहे.