बार्शीटाकळी : तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेचा १२० गुणांचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करणाऱ्या ३८ गावांचा सन्मान सोहळा दि. ३१ ऑगस्ट रोजी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनमध्ये पार पडला. वॉटरकप स्पर्धेच्या कार्यामुळे राज्यातील अनेक गावे पाणीदार झाली. २०२० ते २०२२ या कालावधीतील समृद्ध गाव स्पर्धेत तालुक्यातील ४२ गावांनी सहभाग घेतला. त्यापैकी पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करून पात्र ठरणाऱ्या ३८ गावांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय कृषी सहसंचालक अमरावती तथा जिल्हा कृषी अधीक्षक व समृद्ध गाव स्पर्धेच्या डिजिटल शेतीशाळेचे मार्गदर्शक शंकरराव तोटावार, प्रमुख म्हणून जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोलाचे शिक्षणविस्तार संचालक डॉ. आर. एम. गाडे, पानी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, पीकेव्हीचे जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, मंडल कृषी अधिकारी विलास वाशिमकर, सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश चव्हाण, नूतन हरीश पिंपळे, पं. स. सदस्य रोहिदास राठोड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका समन्वयक संघपाल वाहूरवाघ, विद्याताई आकोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय सामाजिक प्रशिक्षक सुमित गोरले यांच्यासह शुभांगी तायडे, वैशाली खंडाते, रूपाली गावंडे, तुळशीराम लोथे, विजय जाधव, अर्चना इंगोले, तांत्रिक प्रशिक्षक रोशन पुंडकर, विनोद डिवरे, हितेश सरप आदींच्या हस्ते पानी फाउंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
-----------------------------
या गावांचा झाला सन्मान
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होऊन पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करणाऱ्या तालुक्यातील खेर्डा खुर्द ,टेंभी, सराव, हातोला, पिंपळगाव चांभारे, जांभरून, उजळेश्वर ,सायखेड, लोहगड तांडा ,लोहगड गाव, पिंपळगाव हांडे, कान्हेरी सरप ,आळंदा, धाकली, भेंडी महाल, परंडा, घोटा, पराभवानी, वाघजाळी, चेलका, रेडवा ,निंबी खुर्द, निंबी बुद्रुक, धाबा, चिंचोली रुद्रायणी, शेलगाव, निंभारा, रुस्तमाबाद तिवसा बुद्रुक, तिवसा खुर्द, महागाव(मारखेड), सकनी, चिंचोली (देवदरी), धानोरा, फेट्रा, वरखेड(सुकळी), किंनखेड, वडाळा आदी गावांचा ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.