शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

लोकमत सखी मंचच्यावतीने नवनिर्वाचित नगरसेविकांचा गौरव

By admin | Published: March 09, 2017 3:36 AM

महिला दिनाचे औचित्य; शहर विकासासाठी सकारात्मक राहण्याचे आयुक्तांनी केले आवाहन.

अकोला, दि. ८- बदलत्या काळात महिलांनी आपल्यामधील क्षमता अधिकाधिक व्यापक करीत नवनवीन आव्हानांचा सामना केला, नव्या विचारांचा अंगीकार करीत, नेतृत्व विकासाच्या संधीचे सोनं करीत अनेक महिलांनी निर्णय प्रकियेत आपला सहभाग वाढवून नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. महिलांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी मंचने अकोला महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या महिला उमेदवारांचा जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर सन्मान केला. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळय़ाला ह्यलोकमतह्णचे निवासी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजयबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या सोहळय़ाला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना आयुक्त अजय लहाने यांनी अकोला शहराच्या विकासाच्या विविध संकल्पना मांडत महिलांचे निर्णय प्रक्रियेतील योगदान या संदर्भात विवेचन केले. शहराच्या विकासाची सूत्रे ज्या नगरसेवकांच्या हाती आहेत, त्यामध्ये तब्बल ४१ नगरसेविका या महिला आहेत. त्यामुळे महिलांनी शहर विकासाच्या मुद्यावर सकारात्मक पुढाकार घेऊन महापालिकेच्या कामकाजामध्ये आपला ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले. विकासासाठी आलेला निधी हा त्यासाठीच खर्च झाला पाहिजे, त्याचा अपव्यय होत असेल तर विरोध करा, सभागृहात चर्चा होताना वाद होतात; मात्र या वादंगाचा दर्जा असावा, तुमचा मुद्दा हा लोकहितकारी असावा, अशा शब्दात आयुक्त लहाने यांनी महापालिकेच्या कामाची ओळखच करून दिली. महिला दिनाच्या निमित्ताने ह्यलोकमतह्णने हा सोहळा आयोजित करून नारी शक्तीचा सन्मान केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार यांनी केले. कार्यक्रमामध्ये माजी महापौर तथा नगरसेविका सुमनताई गावंडे, ज्येष्ठ नगरसेविका उषाताई विरक, मंजूषा शेळके, सुनीता अग्रवाल, गीतांजली शेगोकार, माधुरी मेश्राम, सुजाता अहीर, धनश्री देव, योगीता पावसाळे, वैशाली शेळके, सारिका जयस्वाल, माधुरी बडोणे, शाहीन अंजूम महेबुब खान, जैनबबी शे. इब्राहीम, चांदनी शिंदे, अजरा नसरीन मकसूद खान, अर्चना मसने, रश्मी अवचार, आरती घोगलिया, नंदाताई पाटील, रंजना विंचनकर, शीतल गायकवाड, जान्हवी डोंगरे, किरण बोराखडे, दीपाली जगताप, शारदा खेडकर, मनीषा भंसाली, आम्रपाली उपर्वट, सोनी आहुजा, प्रमिला गीते, अनिता मिश्रा, सपना नवले, जयश्री दुबे, शारदा ढोरे या ३४ नगरसेविकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.