शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता स्थगित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 4:27 PM

राज्य शासनाने यंदा २0१९-२0 ची प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता स्थगित केली आहे.

अकोला: राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या भरमसाट वाढत आहे. या शिक्षकांचे समायोजन होत नसल्यामुळे शिक्षण विभागासमोर अडचणी वाढत आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून संधी द्यावी, यासाठी राज्य शासनाने यंदा २0१९-२0 ची प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता स्थगित केली आहे.गत तीन-चार वर्षांपासून जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. पटसंख्येअभावी शाळांमधील शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत वाढ होत आहे. रिक्त जागा कमी आणि अतिरिक्त शिक्षक जास्त अशी परिस्थिती सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्भवली आहे. यातून मार्ग कसा काढावा, यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग विचार करीत होता. यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी २0१९ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्यानुसार संचमान्यता, अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीत सल्लागार समितीने निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु त्याबाबत निर्णय न घेतला नाही. वाढती अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येला आळा घालावा आणि शिक्षणसंस्था चालकांना शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याची संधी द्यावी. यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होण्यापासून वाचतील आणि त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार नाही. या उद्देशाने राज्य शासनाने २0१९-२0 या वर्षाची संचमान्यता स्थगित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा