जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी गुरूवारी आगर येथे भेट देऊन कोविड लसीकरण मोहीम व शिकस्त झालेल्या निवासस्थानांची माहिती घेतली. या ठिकाणी ३० वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित असून परिसरात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी दहा वर्षांपूर्वी निवासस्थाने बांधण्यात आले आहे. येथे प्रसूती गृह असल्याने कर्मचारी वर्ग येथेच निवासस्थानी वास्तव्यास आहे. अलीकडेच सदर निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, निवास स्थानांना तडे गेले आहेत. वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्यास अनुचित घटना घडू शकते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोविड लसीकरण मोहिमेसह निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी जगदीश बनसोडे, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय नाथक उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राला जि.प. सीईओंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:23 AM