अकोला: प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना होण्यासाठी या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीकरिता प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी मुद्रा बँक योजनेच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचनही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर अंबेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणिया, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बोके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक प्रभुदास शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सहायक अधिकारी नितीनकुमार डोंगरे आदी उपस्थित होते.