शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

संत्रा व लिंबू या फळपिकांकरिता प्रधानमंत्री पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 3:04 PM

अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१९ मध्ये मृग बहाराकरिता संत्रा व लिंबू या फळपिकांना लागू करण्याबाबत शासनकडून मान्यता मिळाली आहे.

अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१९ मध्ये मृग बहाराकरिता संत्रा व लिंबू या फळपिकांना लागू करण्याबाबत शासनकडून मान्यता मिळाली आहे.संत्रा या फळपिकाकरिता अकोट तालुक्यातील महसूल मंडळ अकोट, उमरा, पणज, अकोलखेड, तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. व हिवरखेड महसूल मंडळ, पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळ, बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा महसूल मंडळ, मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम, हातगाव व निंभा या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लिंबू या फळपिकाकरिता बाळापूर तालुक्यातील वाडेगाव महसूल मंडळ, बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा, धाबा महान व खेर्डा महसूल मंडळ, अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, शिवण, सांगळूद, कापशी व कौलखेड या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.अकोला जिल्ह्यात संत्रा या फळपिकाकरिता विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी रु. ७७ हजार व लिंबू या फळपिकाकरिता विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी रु. ६६ हजार आहे. एकूण विमा हप्ता प्रति हेक्टरी संत्र्याकरिता रु.२१,५६० व लिंबूकरिता रु. १७,४९० आहे. संत्रा फळपिकाकरिता केंद्र व राज्य शासनाचे अनुदान प्रत्येकी रु. ७०९५ आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता संत्र्याकरिता प्रति हेक्टरी रु. ३,८५० असून लिंबूकरिता प्रति हेक्टरी रु. ३,३०० आहे. सदर योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख १४ जून २०१९ आहे. अंतिम मुदतीची वाट न पाहता जास्तीत जास्त शेतकºयांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांनी केले आहे.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी