दहशतवाद विरोधी पथक शनिवारी बाळापूर परिसरात गुन्हेगार शोध मोहिमेवर असताना बाजारामध्ये ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुगारावर कारवाई केली. कारवाई दरम्यान आठ जण संगणकाच्या सहाय्याने एलईडी स्क्रीनवर फन टार्गेट ॲपच्या माध्यमातून जुगार खेळताना आढळून आले. याप्रकरणी उमेष रत्नाकर इंगळे, शेख असलम शेख रउफ, विनोद जानराव उमाळे, शेख इस्माइल शेख युसूफ, जगदीश इंद्रजीतसिंग ठाकूर, गुलाम युनूस गुलाम शब्बीर, फारुख खान अंसार खान, मिथुन तेजराव इंगळे यांना अटक करण्यात आली. हे सर्व बाळापूर येथील रहिवासी आहेत. आरोपींकडून रोख २० हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीचे सीपीयू, एलईडी स्क्रिन, रिमोट डोंगल, २० हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल, असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.
बाळापुरात ऑनलाइन जुगारावर छापा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:44 AM