अकोला : शैक्षणिक सहल उपक्रमांतर्गत शहरातील प्रभात किड्स स्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर आणि सुशिलाबाई देशमुख कन्या विद्यालयातील येथील २५0 विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी लोकमत भवनला भेट दिली आणि लोकमत वृत्तपत्र छपाईच्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. प्रिंटिंग मशीनमधून लोकमत वृत्तपत्राची छपाई कशी होते, हे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले.महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकमत वृत्तपत्राची स्थापना, वृत्तपत्रामधील राजकीय, गुन्हेगारी, सामाजिक, सांस्कृतिक विषयाच्या बातम्यांचे, छायाचित्रांचे संकलन कसे केले जाते, छपाई कशी होते, विविध रंगांचा कागदामध्ये कसा वापर होतो, विविध छायाचित्र कसे छापल्या जातात, याविषयी विद्यार्थी, शिक्षकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. त्यांच्या या उत्सुकतेतूनच विद्यार्थ्यांची सोमवारी एमआयडीसीतील लोकमत भवनला शैक्षणिक सहल आयोजित केली होती.यावेळी प्रभात किड्स स्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, सुशिलाबाई देशमुख कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लोकमत परिवाराच्यावतीने स्वागत करण्यात आले. लोकमत वृत्तपत्र छपाईसह मशीनरी, मशीनमधून पेपर कसा छापल्या जातो, रंग कसे मिसळले जातात, मशीनमध्ये कागद कसा लावला जातो आणि मशीनमधून लोकमतचे वृत्तपत्र छपाई होऊन कसे बाहेर येते. याविषयी विद्यार्थी व शिक्षकांना विस्तृत माहिती दिली. लोकमतच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी, संपादकीय, प्रॉडक्शन, सरक्युलेशन, एचआर विभागांची माहिती दिली. तसेच लोकमत बालमंच विभागाच्यावतीनेसुद्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजिलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी लोकमतच्यावतीने विद्यार्थ्यांना लोकमतमधील सौर ऊर्जा प्रकल्पाचीसुद्धा माहिती देण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न, शंकांचे समाधान करण्यात आले.दरम्यान, लोकमतच्यावतीने सुशिलाबाई देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मसने, शिक्षक श्रीकांत चिकटे, शिल्पा आंडे, स्वाती फुलारी, प्रभात किड्स स्कूलचे शिक्षक प्रिया शर्मा, अलिफिया आलमदार, अमित जोशी, आशीष बेलोकार, स्कूल आॅफ स्कॉलसचे शिक्षक केशव धंदर, विजय महल्ले, अश्विनी उतखडे यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी, शिक्षकांनी घेतली प्रिंटिंग तंत्रज्ञानाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 1:17 PM