अकोला : व्यापारी, उद्योजक व विविध साहित्यांच्या विक्रेत्यांनी काँग्रेसच्या विचारांची कास धरून प्रगत राज्य घडविण्यासाठी सहकार्य करावे, फळ, भाजी विक्रेते, लघुउद्योजक, व्यावसायिक, व्यापारी समवेत छोटे-मोठे व्यापारी आदींच्या विकासासाठी काँग्रेस शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली.
जनता बाजार संघर्ष समिती व भाजी, फ्रूट व्यापारी, विक्रेत्यांच्या सर्व संघटनांच्या वतीने जनता भाजी बाजार येथे आयोजित सत्कार कार्यकमात सत्कारमूर्ती म्हणून ना थोरात मार्गदर्शन करीत होते. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेश सचिव रामकिसन ओझा, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आ. नातीकोद्दीन खतीब, मनपा विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, मब्बा पहेलवान, बाजार संघटनेचे
सज्जाद हुसेन, फ्रूट मार्केट संघाचे हाजी उमरभाई, नगरसेवक इरफानभाई, मोंटूभाई,जमीरभाई, डॉ. सुभाष कोरपे, प्रकाश तायडे, अविनाश देशमुख, विजय तिवारी, सागर कावरे, कपिल ढोके, विलास गोतमारे आदी उपस्थित होते. माणिकराव ठाकरे यांनी राज्यशासन कोणतेही व्यापारी, लघु-मध्यम विक्रेते यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी विकासासाठी सहकार्य करेल, असे आश्वासन देत या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्यात. प्रास्ताविक इंटक नेते प्रदीपकुमार वखारिया यांनी करून बाजारातील भाजी, फ्रूट व अन्य विक्रेते व्यापारी यांच्या व्यापारी आंदोलनाची माहिती सादर केली, संचालन तसवर पटेल यांनी तर आभार प्रदर्शन पंकज मणियार यांनी मानलेत.