शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

‘जीएमसी’वरील भार कमी करण्यास प्राधान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 2:11 PM

सुपर स्पेशालिटी आणि स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीत रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर सर्वोपचारमधील सेवेत सुधारणा होईल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर असले तरी, औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्रीतील तांत्रिक बिघाड आणि जीर्ण इमारतींमुळे रुग्णसेवा नेहमीच प्रभावित होते. शिवाय, ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण उपचारासाठी येथेच येत असल्याने सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसेवेचा भार वाढला आहे. रुग्णसेवेचा हा भार कमी करण्यास प्राधान्य देण्यात येत असून, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुविधा आणखी बळकट करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.हृदयरोग बालकांसाठी टू डी ईको तपासणी शिबिर तसेच अपघातात जखमी नाशिक येथील खेळाडूंना भेट देण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. सर्वोपचार रुग्णालयात दररोज अकोला जिल्ह्यासह बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात; मात्र येथील अनेक वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त असून, रिक्त पदांचीही समस्या आहे. अशातच ग्रामीण भागातील रुग्ण लहान-मोठ्या आजारांच्या उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातच येतात. त्यामुळे येथील डॉक्टरांवर रुग्णसेवेचा भार वाढला आहे. तसेच रुग्णालयाच्या जुन्या इमारतीही धोकादायक ठरत आहेत. एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करीत सर्वोपचार रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता करून सुपर स्पेशालिटी आणि स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीत रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर सर्वोपचारमधील सेवेत सुधारणा होईल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय