अकोला : खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे. सर्वाेपचार रुग्णालयावर अकोल्यासह शेजारच्या जिल्ह्यांचाही ताण आला असल्याने सर्वोपचारमध्ये उपचारासाठी जाण्यास रुग्णांमध्ये धास्ती असली तरी सर्वसमान्यांना सर्वोपचारचाच पर्याय बरा वाटेल असे दर खासगी रुग्णालयांचे आहेत.राज्य शासनाच्या २२ मे २०१८ च्या अधिसूचनेनुसार खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे. खासगी रुग्णालयात एका दिवसाचा दर ठरविण्यात आलेला आहे. यात रुग्णांची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, सोनोग्राफी, 2-डी इको, एक्स-रे, ईसीजी तसेच मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर्स तपासणी, रुग्ण तपासणी चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण, छोटे उपचार, नाकातून नळी टाकणे तसेच लघवीसाठी नळी टाकणे आदींचा समावेश आहे. रुग्णालयांनी नियमाप्रमाणे दर आकारणी न केल्यास, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यास, बिलाची अवाजवी आकारणी केल्यास व इतर मदतीसाठी वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा प्रशासनाची संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. असा आहे एका दिवसाचा दरजनरल वॉर्ड विलगीकरण कक्ष रु. ४,०००आयसीयू व्हेंटिलेटरशिवाय विलगीकरण कक्ष रु. ७,५००आयसीयू व्हेंटिलेटर विलगीकरण कक्ष रु. ९,०००१पीपीई किट, सेंटर लाइन टाकणे, श्वसन नलिका किंवा अन्ननलिकेत दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, कोणत्याही अवयवाचा तुकडा तपासणी पाठवणे, छातीतील किंवा पोटातील पाणी काढणे हे दि. ३१ डिसेंबर २०१९ च्या दरपत्रकाप्रमाणे रुग्णालय आकारू शकतात.२तपासणी शासकीय केंद्रांमध्ये मोफत तर खासगी प्रयोगशाळेद्वारे केल्यास शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे दर आकारणी करावी लागेल.३औषधे, ईमिन्युग्लोबिन, मेरोपेनम, शिराद्वारे दिली जाणारी पोषक औषधे, टोसिलीझुमॅब इत्यादी दर छापील किंमतप्रमाणे असेल.४सिटी स्कॅन, एमआरआय तसेच इतर समाविष्ट नसलेले सर्व स्कॅन व प्रयोगशाळा तपासण्यांचे दर आकारणी ३० डिसेंबर २०१९ च्या दर पत्रकाप्रमाणे रुग्णालय आकारू शकतात. याचा एका दिवसाच्या दरामध्ये समाविष्ट नाही.
खासगी रुग्णालयाचे शासनमान्य दरपत्रक ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 6:14 PM