अकोला : राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांना चर्चेसाठी बोलावून अधिकारी अनुपस्थित राहिले. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी शिक्षणाधिकार्यांच्या दालनात ठिय्या दिला. खासगी प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांना शुक्रवारी दुपारी ४ वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र दिले होते. १८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्रानुसार संघटनेचे पदाधिकारी दुपारी ४ वाजता कार्यालयात पोहोचले. तेव्हा कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे पदाधिकार्यांनी शिक्षणाधिकार्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. अखेर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी पदाधिकार्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्यांबाबत विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकार्यांनी समन्वयाची भूमिका घेत आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनीष गावंडे, सचिव जावेदुजम्मा यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
खासगी प्राथमिक शिक्षकांनी दिला ठिय्या
By admin | Published: March 14, 2015 1:36 AM