लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असलेल्या सावत्र दीराचा खून करणार्या भावजय व तिच्या प्रियकरास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.जांब येथील संजय घायवट यांचे निधन झाल्यावर त्यांची पत्नी वंदनाचे गावातीलच श्यामराव तेलगोटे याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. या कारणावरून घायवट कुटुंब आणि श्यामराव तेलगोटे यांच्यात वाद झाला होता. मात्र, त्यावेळी प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले. त्यानंतर ८ सप्टेंबर २0१४ रोजी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना वंदना व श्यामराव यांनी संगनमताने दीर नितीन घायवटचा कुर्हाडीने घाव घालून हत्या केली होती.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने बुधवारी या प्रकरणात श्यामराव तेलगोटे आणि वंदना घायवट यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन्ही आरोपींना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.
विवाहितेसह प्रियकरास जन्मठेप
By admin | Published: June 22, 2017 4:48 AM