शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
3
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
4
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
5
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
6
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
7
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
8
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
9
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
10
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
11
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
12
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
13
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
14
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
15
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
16
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
18
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
19
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
20
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

शेतकरी अडचणीत; पीक कर्ज वाटप १९ टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 1:45 PM

जिल्ह्यात केवळ ३० हजार ३७४ शेतकºयांना २६८ कोटी ३९ लाख रुपये (१९ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

- संतोष येलकरअकोला : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० हजार ३७४ शेतकºयांना २६८ कोटी ३९ लाख रुपये (१९ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अचडणीत सापडला असताना, पीक कर्जाचे वाटप १९ टक्क्यावरच असून, खरीप पेरणी तोंडावर असताना जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ४७३ शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत शेतकºयांना पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र उद्दिष्टाच्या तुलनेत २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० हजार ३७४ शेतकºयांना २६८ कोटी ३९ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १ लाख ४४ हजार ४७३ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा अद्याप लाभ मिळाला नाही. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होऊन वीस दिवस उलटले असून, खरीप पेरणी तोंडावर आली असताना पीक कर्जाचे वाटप अद्याप १९ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ७४३ शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

१.४४ लाख शेतकºयांना पेरणीपूर्वी कर्ज मिळणार?खरीप हंगामासाठी शेतजमिनीची मशागत, पेरणी, बियाणे-खते व कीटकनाशकांचा खर्च भागविण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता असते; परंतु पावसाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, खरीप पेरणी तोंडावर आली असताना, जिल्ह्यात २० जूनपर्यंत केवळ ३० हजार ३७४ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित १ लाख ४४ हजार ४७३ शेतकºयांना खरीप पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात २६८ कोटी ३९ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.-जी. जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज