अकोला, दि. २१- नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज 'ऑनलाइन' स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत ऑनलाइन उमेदवारी अर्जांसंदर्भात नगरपालिका अधिकारी-कर्मचार्यांना 'व्हिडिओ कॉन्फरन्स'द्वारे प्रशिक्षण दिले जात आहे; मात्र उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याच्या ह्यसॉफ्टवेअरह्णमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होत असलेल्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत उमेदवार उमेदवारी अर्ज 'ऑनलाइन' कसे भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नगरपालिका निवडणुकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज ह्यऑनलाइनह्ण भरावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर त्याची प्रत (प्रिंट) संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करावी लागणार आहे. या पृष्ठभूमीवर ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज स्वीकरण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील नगरपालिकांच्या प्रत्येकी एक अधिकारी-कर्मचार्यांना २0 ऑक्टोबरपासून ह्यव्हिडिओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा स्तरावर घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींंकडून जिल्हय़ातील संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे; परंतु ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरणे व स्वीकारण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची बाब गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ह्यव्हिडिओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे अकोला, बुलडाणा व वाशिम येथील प्रशिक्षणादरम्यान आढळून आली. या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी शनिवारी दूर करण्यात येणार असल्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण देणार्या संबंधित तज्ज्ञांकडून प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचार्यांना सांगण्यात आले. त्यानुषंगाने ऑनलाइन उमेदवारी स्वीकारण्याच्या 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे प्रशिक्षणासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हानिहाय संबंधित अधिकारी-कर्मचार्यांना बोलविण्यात आले आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे; मात्र ऑनलाइन उमेदवारी स्वीकारण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर न झाल्यास उमेदवार ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरणार कसे, याबाबत संभ्रम कायमच आहे.
उमेदवारी अर्जाच्या ‘स्वॉफ्टवेअर’मध्ये अडचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 2:45 AM