अकाेला : अनुसूचित जाती, विजा,भज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रकमांबाबत आधार क्रमांक लिंक न केल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
...............................
ग्लोव्हजचे दर वाढले!
अकाेला : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सर्जिकल ग्लोव्हज २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री केले जात होते. त्याचे दर आता साधारणत: ८० रुपयांपेक्षाही अधिक आहेत. पूर्वी सर्जिकल ग्लोव्हज वापरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते.
...............................
वाहनधारकांवर कारवाई
अकाेला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १०० टक्के लॉकडाऊनचे आवाहन केले आहे. यामुळे शहरात खासगी वाहनांना बंदी आहे. तरीदेखील काही नागरिक गावात वाहन आणत असल्याने अशा वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
...............................
किराणा दुकानांतून गुटखा विक्री सुरू!
अकाेला : शहरातील विविध पानटपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे अनेकदा समोर आले. ब्रेक दी चेनमध्ये केवळ किराणा दुकान सुरू असल्याने आता किराणा दुकानातून गुटखा विक्री सुरू झाल्याची माहिती सूत्राने दिली................................