अकोला: जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून राबविल्या जाणाऱ्या दूधपूर्णा योजनेतील लाभार्थींचे उत्पन्न वाढविण्यासाठी दुधापासून नावीन्यपूर्ण पदार्थ बनवून त्याला बाजारपेठ मिळविण्यासाठी नावीन्यपूर्ण पदार्थाच्या शोधामध्ये पाच विजेत्यांनी सादर केलेल्या पाककृतीला जिल्हा परिषदेच्यावतीने बक्षीस देण्यात आले. पाच विजेत्यांना आमदार बळीराम सिरस्कार, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.लाभार्थींच्या म्हशीचे दर दिवशी दहा ते बारा हजार लीटर दूध संकलन होणार आहे. त्यासाठी दूध बँकही तयार केली जाणार आहे. या लाभार्थीच्या सहकारी संस्थांकडून दुधाचा विशिष्ट पदार्थ निर्मिती करण्याचा पर्याय तपासण्यासाठी पाककृती स्पर्धा घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जसनागरा कॉलेज आॅफ मॅनेजमेंट यांना नवीन पदार्थ निर्मितीसाठी स्पर्धा घेण्याचे सांगितले. नवीन पदार्थ पुढे येण्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत पाच पदार्थांची निवड करण्यात आली. त्यामध्ये राकेश दुबे, कृष्णा डवले, अमोल भंडारकर, सुमित वासनकर, सुनीता इंगळे यांच्या पाककृतींना बक्षीस देण्यात आले. बक्षीसपात्र पदार्थ दुधापासून निर्मिती करण्यासाठी दूधपूर्णा लाभार्थींकडून दूध खरेदी करण्यात येईल. तसेच त्या पदार्थाला बाजारपेठ मिळविण्याचाही प्रयत्न होणार आहे. त्यातून संबंधित लाभार्थींचे उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यात १०४२ म्हशी लाभार्थींना दिल्या जात आहेत. त्यासाठी राष्ट्रीयीकृत १६ बँकांकडून कर्ज पुरवठाही केला जाणार आहे.- जिल्हा बँकेची नकारघंटाजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या लाभार्थींना म्हशी खरेदीसाठी कर्ज देण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हात आखडता घेतला आहे. जिल्हा परिषदेचा कोट्यवधींचा निधी या बँकेच्या खात्यात आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या योजनेसाठी काही लाभार्थींना कर्ज देण्यास बँकेची नकारघंटा आहे. पाठपुरावा केल्यानंतर आता कागदपत्रे घेतली जात आहेत, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.- दुसºया टप्प्यात पदार्थ निर्मितीलाभार्थींना दुधाळ जनावर दिल्यानंतर त्यापासून दुसºया टप्प्यात दुधाचे पदार्थ निर्मिती नियोजन आहे. त्यानुसार आता लाभार्थींना दूध उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजार उपलब्ध केला जात आहे. जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागासाठी असलेल्या निधीतून दूधपूर्णा योजना राबविली जात आहे. दोन दुधाळ जनावरे देण्यासाठी ५२१ लाभार्थींची निवड झाली आहे. या लाभार्थींना बँकेचे कर्ज, गोठा आणि बायोगॅस देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. योजनेत प्रतिलाभार्थी ८५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.- आमदारांनी केला ‘सीईओं’चा सत्कारग्रामीण भागातील लाभार्थींसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा सत्कार केला. सोबतच जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचे संकल्पचित्र तयार करणाºया आर्किटेक्टचाही सत्कार करण्यात आला.