अकोला : आर्थिक उत्पन्न,सामाजिक-आर्थिक बदल घडविण्यासाठी आदवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती व तत्सम व्यवसायासाठी कृषीपूरक तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे.यासाठीचा सामंज्यस करार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एका मैत्री ट्रस्ट सोबत शुक्रवारी केला.मेळघाटातील आदीवासी व दूर्गम भागातील शेतकऱ्यांनी नव कृषी तंत्रज्ञान वापरू न शेती करावी,आदीवासी भागात सेंद्रीय शेतीला मोठा वाव आहे. तेथील शेतकऱ्यांना गरजेनुसार कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान,सुधारीत बियाणे, भाजीपाला,फळे, तसेच पिकावरील किड व रोगांची माहिती देण्यासाठी कृषी विद्यापीठ व ही संस्था काम करणार आहे.जमिनीचे आरोग्य, माती, व जलसंधारण, सुधारित वनौषधी लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करू न येथील शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.या करारावर कृषी विद्यापीठातर्फे डॉ.डी.एम. मानकर व मैत्री ट्रस्टचे मुकुंद केळकर यांनी स्वाक्षरी केली.याप्रसंगी कृषी व अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी.एन.गणवीर, सहयोगी संशोधन सहायक डॉ. राजेंद्र काटकर,कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ.व्ही.ए. खडसे, प्रा. संजिवकुमार सलामे,डॉ. के.टी. लहरिया, डॉ.एस.डी. मोरे,ट्रस्टचे राहुल धर्माधिकारी,मंगेश जोशी,रामेश्व फड, यांच्यासह मेळघाटातील मैत्रीचे स्वयंसेवक, शेतकºयांची उपस्थिती होती.
आदीवासी दुर्गम भागात करणार कृषी तंत्रज्ञान प्रसार; कृषी विद्यापीठाने केला करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 6:23 PM