अकोला: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोन दिवसांचा कालावधी उरला असून, जिल्हय़ातील पाचही मतदारसंघात सुरू असलेली निवडणूक प्रचाराची धूम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक प्रचाराची मुदत सोमवारी सायंकाळी संपुष्टात येत असल्याने, निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेला प्रचार तोफा सोमवारी सायंकाळपासून थांबणार आहे. विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्हय़ातील आकोट, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बसपा व इतर राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया संपण्याच्या ४८ तासाआधी म्हणजेच सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता निवडणूक प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील पाचही मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ धडाडणार्या निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी शांत होणार आहेत
प्रचार तोफा आज थंडावणार!
By admin | Published: October 13, 2014 1:37 AM