अकोला: घराच्या नकाशाला परवानगी देताना नगररचना विभागाकडून अनेकदा त्रुटी काढली जाते. या त्रुटीची पूर्तता करताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येतात. ही बाब ध्यानात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी गुरुवारी मुख्य सभागृहात शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रलंबित प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याने मालमत्ताधारकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने ११४ पेक्षा अधिक प्रस्ताव निकाली काढत घर बांधकामाची परवानगी दिली.घराच्या बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी क्रमप्राप्त आहे. या विभागात नकाशा मंजुरीसाठी दाखल प्रस्तावांमध्ये त्रुटी निघतात. अनेकदा संबंधित अधिकारी-कर्मचारी कामात व्यस्त असल्याने संबंधित मालमत्ताधारकांसोबत संवाद साधणे शक्य होत नाही. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्यात बराच कालावधी निघून जातो. तूर्तास नगररचना विभागामध्ये १४० ते १५० बांधकाम नकाशे मंजुरीसाठी प्रस्तावित होते. संबंधित मालमत्ताधारकांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर सदर प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाच्या मुख्य सभागृहात नगररचना विभागाच्यावतीने शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मालमत्ताधारकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. महापौर विजय अग्रवाल यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, प्रशासनाला निर्देश दिले. त्यावेळी नगररचनाकार संजय पवार, सहा. नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे यांच्यासह नगररचना विभागातील कर्मचाºयांनी कामकाज निकाली काढले.
रात्री ११ पर्यंत कामकाजसर्वसामान्यांच्या सोयीसाठी मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता शिबिराला प्रारंभ झाला. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी स्वत: आयुक्त संजय कापडणीस उपस्थित होते. दुपारी आयुक्त कापडणीस यांनी निवासस्थानी न जाता कर्मचाऱ्यांसोबत जेवण करणे पसंत केले. रात्री ११ वाजतापर्यंत ११४ पेक्षा अधिक मालमत्ताधारकांना बांधकाम परवानगी देण्यात आली.के्र डाईच्या पदाधिकाºयांनी केले मार्गदर्शन!प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी नागरिकांनी सभागृहात गर्दी केली होती. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष दिलीप चौधरी, नितीन हिरूळकर, जितेंद्र पातूरकर, किशोर अग्रवाल, पुरुषोत्तम मालाणी, संतोष मोहता, संतोष अग्रवाल, अनिल ताकवाले व आनंद बांगड यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.