शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,१३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,८७६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये गजरखेड आपातापा येथील ५० वर्षीय पुरुष, कृषिनगर येथील ६१ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६१ वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर येथील २७ वर्षीय पुरुष, गीतानगर भागातील ५५ वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मूर्तिजापूर- ३२, अकोट- ३७, बाळापूर- १३, तेल्हारा- २५, बार्शी टाकळी- २०, पातूर-१६, अकोला-११९. (अकोला ग्रामीण-३०, अकोला मनपा क्षेत्र-८९)
६१५ जण कोरोनामुक्त
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील दोन, खासगी रुग्णालयांमधील ६३, होम आयसोलेशनमधील ५१० अशा एकूण ६१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,४१३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३,७५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४६,३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १०१० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,४१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.