अकोला: रमजान ईद उत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील तब्बल ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.सण, उत्सवाच्या काळात शहरात शांतता नांदावी. कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असते. सण, उत्सवामध्ये शहरातील गुंडांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये. यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील गुंडांना तडीपार करण्यात येते. १६ जून रोजी पवित्र रमजान ईद उत्सव असल्याने, या उत्सवात विघ्न नको, म्हणून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या आदेशानुसार शहरातील आठही पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ११२ गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. (प्रतिनिधी)तडीपार करण्यात येणारे गुंडरामदास पेठ १९जुने शहर २३डाबकी रोड १९अकोट फैल १४एमआयडीसी १५खदान ०७कोतवाली ०५