अकोला:राज्य शासनाच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा सवलत गुण देण्यात येते. ज्या खेळाडूंनी जिल्हा,विभाग,राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करून राज्याचे नाव उंचावले आहे अशा खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून ग्रेस गुण मिळतात. मात्र,यावेळी कोरोना विषाणू मुळे उद्भभवलेल्या परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान होऊ नये,यासाठी प्रस्ताव देण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीने शासनाकडे केली आहे.जागतिक स्तरावर कोविड -१९ ( कोरोना ) या विषाणूमुळे उदभवलेली परिस्थिती व उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने या साथीचा संसर्ग होऊ नये म्हणून महाराष्ट्रात पहिल्या टप्यात १४ मार्च ते १४ एप्रिल या दरम्यान व दुसऱ्या टप्यात १५ एप्रिल ते ३ में असे संचारबंदी कायदा (लॉकडाऊन ) लागू केल्यामुळे सर्व शिक्षण संस्था या कालावधीत बंद करण्यात आल्या आहेत तसेच जिल्'ांमध्ये सिमाबंदी करण्यात आली आहे या कारणास्तव विविध शैक्षणिक संस्थाना व खेळाडूंना त्यांच्या जिल्'ातील क्रीडा कार्यालयात विहित मुदतीत ग्रेस गुण प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही. तसेच क्रीडा खात्याकडून विभागीय शिक्षणमंडळाकडे ग्रेस गुण प्रस्ताव विहित कालावधीत पाठवणे गरजेचे असते परंतु संचारबंदी कायद्यामुळे व शासनाचे सक्त आदेशामुळे हे शक्य झाले नाही.दुसºया टप्यातील संचारबंदी ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने खेळाडू ग्रेस गुण सवलतीचे प्रस्ताव पाठविण्याची मुदत १५ मे पर्यंत वाढविण्यात यावी. जेणेकरून राज्यातील गुणवंत खेळाडू सवलतीच्या गुणांपासून वंचित राहणार नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन समितीचे अध्यक्ष विषवनाथ पाटोळे यांनी दिले आहे,अशी माहिती संजय मैंद यांनी दिली.
क्रीडा गूण सवलत वाढीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:02 PM