अकोला: गौण खनिजाचे स्वामीत्वधन शुल्क (रॉयल्टी) बुडविल्याने महानगरपालिकासह कंत्राटदारांना १ कोटी ६३ लाख २५ हजार रुपये दंड प्रस्तावित करण्यात आल्याची नोटीस अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी गुरुवारी बजावली. महानगरपालिकामार्फत शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये वापर करण्यात आलेल्या गौण खनिज वापराचे स्वामीत्वधन शुल्क (रॉयल्टी)रकमेचा संबंधित कंत्राटदारांकडून भरणा शासकीय खजिन्यात करण्यात आला की नाही, यासंदर्भात अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे व जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांच्या पथकाने गुरुवारी महानगरपालिकेत ह्यरेकॉर्डह्णची तपासणी केली. त्यामध्ये ३४ कामांच्या ह्यरेकॉर्डह्णची तपासणी करण्यात आली. मनपाच्यावतीने कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या रस्ते, समाज मंदिरांच्या ३४ कामांसाठी रेती, गिट्टी व मुरुम इत्यादी गौण खनिजाचा वापर करण्यात आला; मात्र गौण खनिज वापराच्या स्वामीत्वधन शुल्क (रॉयल्टी) रकमेचा भरणा केल्याबाबत पावत्या जोडण्यात आल्या नसल्याने, गौण खनिजाच्या ह्यरॉयल्टीह्णची रक्कम बुडविण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे यासंदर्भात मनपासह संबंधित कंत्राटदारांना १ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात येत असल्याची नोटीस तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी बजावली. यासंदर्भात तहसीलदारांकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.
अकोला मनपासह कंत्राटदारांना दीड कोटीचा दंड प्रस्तावित!
By admin | Published: March 11, 2016 3:01 AM