शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

अकोला शहरातील स्वच्छतागृहांचा प्रस्ताव कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:18 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर अग्रवाल यांनी स्वत: सदर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील बाजारपेठ, गर्दीच्या जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्यता द्यावी, यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी सुरुवातीला पाठपुरावा केला.मागील वर्षभरापासून हा प्रस्ताव महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या लालफीतशाहीत अडकला आहे. मोठमोठ्या विकास कामांचा गवगवा करणाऱ्या सत्ताधारी भाजपचे सर्वसामान्यांना भेडसावणाºया समस्यांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसह प्रशासकीय कामकाजानिमित्त बाहेरगावच्या नागरिकांची सतत वर्दळ असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खुल्या जागा, शासकीय आवारभिंतीलगतच्या जागेचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठ वसली असून, पुरुष आणि महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी या भागात स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक आहे.सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाºया; परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. दोन वर्षांपूर्वी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले; परंतु सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्या ठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी मुख्य बाजारपेठसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते.या विभागाने पहिल्या टप्प्यात दहा जागा निश्चित केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर अग्रवाल यांनी स्वत: सदर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव रखडल्याचे समोर आले आहे.

या ठिकाणी स्वच्छतागृह प्रस्तावित

  • दुर्गा चौकातील मुख्य नाला
  • जवाहर नगर चौक
  • सिव्हिल लाइन चौक (जि. प. सर्किट हाउस)
  • सिटी कोतवाली चौक, हायड्रंटजवळ
  • कोठडी बाजार, मुख्य नाल्याजवळ
  • जुना धान्य बाजार
  • गांधी चौक, जैन मंदिरालगत
  • टिळक रोड, आकार डेव्हलपर्सजवळ
  • जयहिंद चौक, जि. प. उर्दू शाळेचे आवार
  • मंगरूळपीर रोड, क्लासिक बारजवळील नाला.
टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका