अकाेला : काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्यामुळे शाळा पूर्ववत सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने काढलेला आदेश रद्द केलेला असला, तरी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत शिक्षण विभागाने नियाेजन केले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग यांनी पाच शाळांना १२ ऑगस्ट तर तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथे ५ ऑगस्ट राेजी भेट देऊन पाहणी केली असता सहा शाळा बंद आढळून आल्या हाेत्या. या प्रकरणात संबंधितांना बजावलेल्या कारणे दाखवा नाेटीसमधील उत्तरे असमाधानकारक असल्याने या शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रस्ताव तयार झाले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी ठग यांनी दिली.
शिष्यवृत्ती परीक्षेचे नियाेजन व तपासणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग या सहकाऱ्यांसह १२ ऑगस्ट राेजी दाैऱ्यावर हाेत्या. दरम्यान, त्यांनी काही शाळांना भेट दिली असता. बाळापुरातील जि. प. शाळा, इंदिरानगर मराठी व उर्दू वाडेगाव, पातूरमधील बेलुरा बु., हिंगणा, अकाेल्यातील गाेरेगाव खुर्द, कळंबेश्वर व तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील शाळा बंद आढळून आल्या हाेत्या. या शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे, तर जांभरून येथील एक शिक्षक मद्यपान करून शाळेत हजर हाेता. त्याला निलंबित करण्यात आले आहे.
.....
बंद आढळून आलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या निलंबनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आहेत. त्यामुळे दाेषींवर कारवाई हाेईलच, काेणलाच अभय मिळणार नाही.
डाॅ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक
या शाळा हाेत्या बंद
भांबेरी मराठी / उर्दू पं.स., तेल्हारा
बेलुरा बु. / खु. , हिंगणा, पं.स., पातूर
इंदिरानगर वाडेगाव मराठी/ उर्दू पं.सं., बाळापूर
गोरेगाव खु., पं.सं., अकोला
कलंबेस्वर, पं.सं., अकोला