शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

इतिवृत्तातून कॅफोवर कारवाईचा प्रस्ताव वगळला!

By admin | Published: April 18, 2017 1:45 AM

सभापती अरबट यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अकोला : जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा सचिव मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनीच संपवण्याचा प्रकार १० एप्रिल रोजी घडला. त्या सभेत आधीच्या सभेचे इतिवृत्त न ठेवल्याने सचिवावर जबाबदारी निश्चित करून कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्याचे निर्देश सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिले होते. मात्र, ते आदेशच सभेच्या इतिवृत्तातून वगळून सभापतींची दिशाभूल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. अर्थ समितीची सभा सोमवारी बोलावण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेवर गेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, हा विषयच नव्हता. ही बाब सदस्या रेणुका दातकर, ज्योत्स्ना बहाळे यांनी उपस्थित केली. त्यावर सभापती अरबट यांनी सभेच्या सचिव म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांना विचारणा केली. त्यावर गेल्या वर्षीच्या सभेतही हा विषय घेण्यात आला नव्हता, असे त्यांनी सांगितले. विषय न ठेवण्याबाबत काही नियम आहे का, अशी विचारणा केली असता नागर यांनी इतिवृत्त २३ मार्चच्या सभेत ठेवल्याने यावेळी ठेवले नाही, असे सांगितले. नागर यांच्या उत्तराने समाधान होत नाही, असे सांगत रेणुका दातकर यांनी त्यांना धारेवर धरले. त्यामुळे नागर यांनी अनावधानाने ही चूक झाल्याचे मान्य केले. आता वेळेवरच्या विषयामध्ये इतिवृत्त घेऊ, असेही सुचवले. मात्र, सभापती अरबट यांनी चूक झाली असेल, तर सभेच्या सचिवावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे सांगितले. त्यामुळे नागर यांची तारांबळ झाली. सभापतींची परवानगी न घेता स्वत:च सभा संपल्याचे सांगत त्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले. हा मुद्दाही वादाचा ठरणार!त्या सभेचे इतिवृत्त तयार करून स्वाक्षरीसाठी सभापती अरबट यांच्याकडे पाठवण्यात आले. मात्र, त्यामध्ये सचिवांनी चूक झाल्याचे मान्य करणे, कारवाईसाठीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करणे, याबाबींचा उल्लेखच नाही. त्यामुळे सभापतींचे निर्देश इतिवृत्तांतून का वगळण्यात आले, हा मुद्दाही आता वादाचा होणार आहे.