अकोला: बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा लक्षात घेता खुद्द महापौर विजय अग्रवाल यांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर केला. मागील अनेक दिवसांपासून हा प्रस्ताव महसूल विभागाकडे रखडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाला महसूल विभागाने तातडीने मंजुरी देण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसह प्रशासकीय कामकाजानिमित्त बाहेर गावच्या नागरिकांची सतत वर्दळ असते. स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खुल्या जागा, शासकीय आवारभिंतीलगतच्या जागेचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठ वसली असून, पुरुष आणि महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी या भागात स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक आहे. सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाऱ्या परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत वर्षी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली; परंतु सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्या ठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’अभियान अंतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी पुढाकार घेत मुख्य बाजारपेठसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. या विभागाने पहिल्या टप्प्यात दहा जागा निश्चित केल्या आहेत. जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने व सर्वसामान्यांची कुचंबणा पाहता महापौर विजय अग्रवाल यांनी स्वत: सदर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. यानंतर हा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांमार्फत अंतिम मंजुरीसाठी पुन्हा जिल्हाधिकाºयांकडे सादर होईल. तूर्तास हा प्रस्ताव रखडल्याचे चित्र समोर आले आहे.