रस्त्यावर पार्किंग, वाहतुकीस अडसर
अकाेला: जनता भाजी बाजारासमोर दररोज सकाळी रस्त्यावरच वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस नेहमीच अडसर निर्माण होतो. या मार्गावर उड्डाण पुलासह अंडरपासचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. याकडे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अवैध होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण
अकोला : शहरातील विविध भागात लावण्यात आलेल्या अवैध होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मध्यंतरी महावितरणच्या खांबांवर लावण्यात आलेल्या होर्डिंग मालकांविरोधात कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे महापालिकेतर्फे अवैध होर्डिंगवर कारवाई करण्यात आली नाही.
गायगाव मार्गाची दुरवस्था
अकोला : डाबकी मार्गे गायगाव जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. डाबकी रोडवरील उड्डाण पूल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ पसरलेली आहे. ही धूळ वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
टिळक रोडवर वाहतुकीची कोंडी
अकोला : टिळक रोड परिसरात दर रविवारी रस्त्यावरच बाजार भरतो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रविवारीदेखील या मार्गावर हीच स्थिती दिसून आली. गर्दीमुळे येथून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. परिणामी दुपारच्या सुमारास मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.
रस्त्याचे अर्थवट बांधकाम
अकोला : शहरातील टिळक रोड ते अकोट स्टॅन्ट या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले; मात्र हा रस्ता काही ठिकाणी अर्थवट सोडण्यात आला आहे. त्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवरदेखील होताना दिसताे. अर्थवट सोडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.